ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गरजूंपर्यंत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न : जालिंदर काटे

सामाजिक उपक्रम : पुनावळे परिसरात आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पुनावळे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सुरक्षा अभियान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभागी होत आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली, आवश्यक नोंदणी करून घेतली तसेच विविध आरोग्यविषयक सेवांचा लाभ घेतला. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या शिबिराच्या आयोजनात भाजपा युवा मोर्चा सचिव जालिंदर काटे यांनी पुढाकार घेतला. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत विविध स्तरांवर समन्वय साधला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिकांच्या सहकार्याने शिबिराचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता किसान मोर्चा मंडल अध्यक्ष रामदास भाऊ काटे, भरत अण्णा काटे, बाजीराव तात्या बहिरट, राजू तात्या ताजने, मच्छिंद्र तात्या काटे, बाळासाहेब काटे, संतोष दादा दर्शले, गणेश भाऊ दर्शले, ज्येष्ठ पत्रकार नंदन मिठारी, प्राध्यापक अण्णा त्र्यंबक पाटील, अनिल बारवकर, सुनील कांबळे, महावीर देशमाने, सुभाष महाले, सचिन काटे, मारुती काटे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी शिबिराच्या आयोजनाचे कौतुक करत अशा जनहिताच्या उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गोल्डन ट्रेजर सोसायटीचे चेअरमन व सदस्य समिती यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने शिबिर पार पडले. याबद्दल आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले.

हेही वाचा –  भोसरी प्रभाग क्र. ५ मध्ये ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जालिंदर काटे म्हणाले, “आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेचा लाभ कोणताही पात्र नागरिक केवळ माहितीअभावी वंचित राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने जनजागृती करत आहोत. भविष्यातही अशाच लोकाभिमुख आरोग्य शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची सविस्तर माहिती मिळाली, तसेच आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया आणि योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आयुष्यमान भारत योजना ही केवळ एक शासकीय योजना नसून, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आरोग्य संरक्षणाची मोठी हमी आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. कोणताही नागरिक माहितीअभावी किंवा तांत्रिक अडचणींमुळे या योजनेपासून वंचित राहू नये, हेच आमचे ध्येय आहे.”

– जालिंदर काटे, सचिव, भाजपा, युवा मोर्चा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button