ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव

शिक्षण विश्व: प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा 13 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि नेतृत्वगुणांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना कष्ट, सातत्य आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

विज्ञान शाखा समन्वयिका डॉ. सुनिता पटनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या 13 वर्षांतील संस्थेने दिलेल्या संधी, विश्वास आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेमुळेच आपली शैक्षणिक कारकीर्द घडल्याचे सांगताना त्या भावूक झाल्या.

हेही वाचा

युद्ध संपले! अमेरिका-इराणमध्ये अखेर ऐतिहासिक शांतता करार; हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली

संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा यांनी आपल्या भाषणात प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्यनिष्ठा, धाडसी नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व विद्यमान व माजी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धात्मक युगात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशस्वी व आदर्श नागरिक बनावे, तसेच पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधांवर प्रकाश टाकत प्राचार्या डॉ. कुऱ्हाडे व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहा भाटिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले.

यावेळी संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रा. जास्मिन फरास, प्रा. वैशाली देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 13 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने 14व्या वर्षात पदार्पण केले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची गेल्या 13 वर्षांची वाटचाल ही विद्यार्थ्यांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट, सातत्य आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर स्वतःचे भविष्य घडवावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध राहील.

– प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button