मुंबई : ‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी लोकभवन, मुंबई येथे व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी ‘टीबी मुक्त भारत – लोकभवन महाराष्ट्र उपक्रम’ या विषयावरील पोस्टरचे अनावरण केले.
हेही वाचा – मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन
उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या देशातून क्षयरोग निर्मूलनाच्या आवाहनाशी सुसंगत असल्याचे सांगितले.
मुंबईतील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.




