Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली. सर्वात धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल २५ वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबईत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय. तर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के,  ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय. त्यामुळे 29 महापालिकेत कोणाची सत्ता, कोणाचा महापौर होणार?, हे जाणून घ्या.

हेही वाचा –  हा कौल प्रगतीचा, अधिक गती देणारा…, महापालिका निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

क्रमांकमहापालिकेचं नावकोणाची सत्ता?
1बृहन्मुंबई- एकूण जागा- 227 भाजप-शिंदे गट आघाडीवर
2भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90काँग्रेस
3नागपूर – एकूण जागा-151भाजप
4पुणे – एकूण जागा-162भाजप
5ठाणे – एकूण जागा-131शिवसेना शिंदे-भाजप
6अहिल्यानगर – एकूण जागा-68भाजप – राष्ट्रवादी
7नाशिक – एकूण जागा-122भाजप
8पिंपरी-चिंचवड – एकूण जागा-128भाजप
9छत्रपती संभाजीनगर – एकूण जागा-113भाजप
10वसई-विरार – एकूण जागा-115बहुजन विकास आघाडी
11कल्याण-डोंबिवली – एकूण जागा-122भाजप-शिंदे गट आघाडीवर
12नवी मुंबई – एकूण जागा-111भाजप आघाडीवर
13अकोला – एकूण जागा-80भाजप
14अमरावती – एकूण जागा-87भाजप-राष्ट्रवादी
15लातूर – एकूण जागा-70काँग्रेस-वंचित
16नांदेड-वाघाळा – एकूण जागा-81भाजप
17मीरा-भाईंदर – एकूण जागा-96भाजप
18उल्हासनगर – एकूण जागा-78इस्लाम पक्ष-एमआयएम आघाडीवर
19चंद्रपूर – एकूण जागा-66काँग्रेस
20धुळे – एकूण जागा-74भाजप
21जळगाव – एकूण जागा-75भाजप
22मालेगाव – एकूण जागा-84 
23कोल्हापूर – एकूण जागा-92महायुती
24सांगली-मिरज-कुपवाड – एकूण जागा-78महायुती
25सोलापूर – एकूण जागा-113भाजप
26इचलकरंजी – एकूण जागा-76भाजप
27जालना – एकूण जागा-65भाजप
28पनवेल – एकूण जागा-78भाजप आघाडीवर
29परभणी – एकूण जागा-65ठाकरे-काँग्रेस

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button