Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

कॅप्टन ऋतुराज कदम यांची एनसीसी कॅडेट म्हणून निवड

शिक्षण विश्व: प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला बहुमान

पिंपरी चिंचवड: डॉ डी वाय पाटील प्रतिष्ठान संचलित डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे येथील एनसीसी कॅडेट कॅप्टन रुतुराज कदम यांची प्रजासत्ताक दिन शिबिर आरडीसी २०२६ मधील बेस्ट कॅडेट स्पर्धेसाठी निवड झाली असून ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे

आरडीसी हे नॅशनल कॅडेट कॉर्प्स अंतर्गत आयोजित होणारे सर्वोच्च राष्ट्रीय स्तरावरील शिबिर असून ते जानेवारी २०२६ मध्ये नवी दिल्ली येथील कॅरिअप्पा परेड मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग हा या शिबिराचा प्रमुख टप्पा असतो

कठोर व बहुस्तरीय निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या कॅडेट कॅप्टन रुतुराज कदम यांनी उत्कृष्ट शिस्त नेतृत्वगुण शारीरिक क्षमता तसेच राष्ट्रीय सेवेप्रती निष्ठा सिद्ध केली आहे

हेही वाचा –  खरीप पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक अपूर्ण, कृषी वित्त पुरवठ्यावर अतिवृष्टीचाही परिणाम

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे ट्रस्टी तेजस पाटील यांनी अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले कॅम्पस डायरेक्टर अॅडमिरल अमित विक्रम निवृत्त यांनीही या यशाबद्दल शुभेच्छा देत महाविद्यालयाचा गौरव वाढविल्याबद्दल अभिनंदन केले. प्राचार्या डॉ. पी मालती यांनी कॅडेट कॅप्टन रुतुराज कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच डीन प्रशासन डॉ एस एस सरनोबत डीन विद्यार्थी कल्याण डॉ स्मिता पाटसकर आणि रजिस्ट्रार प्रशांत भालेराव यांनीही अभिनंदन करून एनसीसी क्षेत्रातील यशाचे महत्त्व अधोरेखित केले

एनसीसी सी टी ओ डॉ विनोद हिवसे यांनी कॅडेटला योग्य मार्गदर्शन केले असून भविष्यातही रुतुराज कदम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एनसीसी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला..डॉ डी वाय पाटील प्रतिष्ठान संचलित डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने कॅडेट कॅप्टन रुतुराज कदम यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button