आरोग्य, स्वच्छता आणि संकटावर मात करणारा नेता : तुषार कामठे
मिशन- PCMC : “प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी, प्रत्येक रस्त्याची स्वच्छता

पिंपरी-चिंचवड : अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या गरजेनंतर, आजच्या काळात आरोग्य ही सर्वात महत्त्वाची मूलभूत गरज बनली आहे. कोरोना महामारीने शहरात सर्वत्र हाहाकार माजवला होता; लोक भयभीत झाले आणि कोरोना प्रतिबंधित लस मिळविण्यासाठी नागरिक जीवाचे रान करत होते. नोंदणीसाठी आरोग्य केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या धडपडीला थांबविण्यासाठी आणि नागरिकांना वेळेवर लस मिळविण्यासाठी, तुषार कामठे यांनी आपल्या प्रभागात तातडीचे लसीकरण केंद्र सुरू केले. या केंद्रांमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आणि कोरोना प्रतिबंधन अधिक सुलभ झाले.
संकटे याच थांबले नाहीत. वायसीएम रुग्णालयात गॅस गळतीमुळे चार जण मृत्युमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच, तुषार कामठे रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा ताबडतोब आढावा घेतला. या काळात त्यांना स्वतःला कोरोना झाला; तरीही, त्यांचे काम थांबले नाही. कमी वेळेत आरोग्य सुविधा उभारणे आणि लसीकरण मोहीम यशस्वी करणे हे आव्हानात्मक होते, पण तुषार कामठे यांनी हार न मानता आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने, नागरिकांसाठी हे संकट यशस्वीरीत्या पेलले.
हेही वाचा – तळवडे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्णायक आघाडी; प्रचार झंझावाती
याव्यतिरिक्त, तुषार कामठे यांनी सरकारी रुग्णालयांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि नागरिकांना घराजवळच वेळेवर उपचार मिळू शकले. अत्यल्प दरात औषधे व उपचार उपलब्ध असल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताणही कमी झाला आहे.
आरोग्याबरोबरच स्वच्छता आणि सार्वजनिक व्यवस्थापन याकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. प्रभागात नियमित घंटागाडी सुरु करून त्यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या स्वच्छतेच्या संकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. कचरा संकलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि नियोजन यामुळे प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त राहिला आहे.
या सर्व मानवतेच्या कार्याचा फायदा आता तुषार कामठे यांना निवडणुकीत होणार आहे. प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निखल- विशालनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार तुषार कामठे, संकेत जगताप, सारिका कस्पटे, सीमा साठे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“माझ्यासाठी प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी फक्त वचन देत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. कोरोना महामारीच्या धक्क्यांना तोंड देताना लसीकरण केंद्र सुरू केले आणि नागरिकांना वेळेवर मदत केली. संकट, आपत्ती, कोणताही अडथळा – काहीही असो, मी हार मानत नाही. प्रभाग आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित असेल तरच त्याची खरी समृद्धी साधता येते, आणि त्यासाठी मी प्रत्येक क्षण झटतो.”
– तुषार कामठे, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, प्रभाग- 26.





