तळवडे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्णायक आघाडी; प्रचार झंझावाती
मिशन- PCMC : तळवडे प्रभागात तीन नव्या चेहऱ्यांना संधी

पिंपरी-चिंचवड : तळवडे प्रभागातील महत्त्वाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सत्तेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णायक पाऊल उचलल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या विचारसरणीवर जनतेचा विश्वास दृढ राहिला असून, यावेळी पक्षाने नव्या जोमाने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने तळवडे प्रभागात तीन नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनुभवी नगरसेवक पंकज भालेकर यांनाही उमेदवारी दिली आहे. पंकज भालेकर यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा – भोसरीतील प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद
तळवडे प्रभागातील उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा धनंजय भालेकर आणि चारुलता सोनवणे यांनी जोरदार तयारी केली आहे. सध्या हे चारही उमेदवार प्रत्येक गल्लीत आणि घरात प्रचार करत असून, झंझावाती प्रचाराची ऊर्जा तळवडे परिसरात जाणवते. “आमचा पक्ष घड्याळ… आमचा उमेदवार घड्याळ!” असे घोषणांचे उद्रेक परिसर दणाणून टाकत आहे.
विशेष म्हणजे, प्रचारात महिलांचा सहभाग जास्त असून, रॅली, पदयात्रा आणि गाठीभेटींमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. नागरिकांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाच्या विश्वासाला अधिक बळ देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटित आणि आक्रमक प्रचारामुळे विरोधक गोंधळले असून, विरोधकांची रणनीती कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. विश्लेषकांच्या मते, तळवडे प्रभागात विकासाचा रेकॉर्ड, नव्या चेहऱ्यांचा सामावेश आणि जनतेचा विश्वास या घटकांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी दृढ आहे. तळवडे प्रभागात सत्तेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा सत्ता पुनःस्थापित होण्याची शक्यता अधिक दिसत आहे.




