Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

टेक ऑफसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज; प्रवाशांच्या सेवेत दाखल

Navi Mumbai Airport :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकृतपणे व्यावसायिक विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी प्रवाशांचा प्रचंड उत्साह वाढला आहे.

नोव्हेंबरपासूनच अनेकांनी पहिल्या प्रवासासाठी तिकीट आरक्षण करून ठेवल्याने पहाटे साडेसहा वाजल्यापासूनच विमानतळाच्या प्रवेशद्वारांवर गर्दी वाढू लागली. आज पहिल्याच दिवशी या विमानतळावरून १५ विमाने उड्डाण करतील. दिवसभरात एकूण ३० ‘एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स’ होतील. या विमानतळाच्या सुरू होण्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा आणि विमानांचा अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिले यशस्वी विमान अवतरण झाले. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E460 प्रकारच्या विमानाने रनवेवर सुरक्षित लँडिंग करत या भव्य प्रकल्पाच्या कार्यान्वयनाकडे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे

हेही वाचा –  शिवसेना ठाकरे गट, मनसे युती; दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा हादरा, बडा नेता शिवसेनेत

या ऐतिहासिक सोहळ्याची पूर्वसंध्या अत्यंत दिमाखदार साजरी करण्यात आली. विमानतळ कार्यान्वित होण्याच्या आनंदात बुधवारी रात्री १,५१५ ड्रोन्सचा वापर करून आकाशात एक भव्य ‘ड्रोन शो‘ आयोजित करण्यात आला होता. या ड्रोन शोच्या माध्यमातून विमानतळाच्या प्रवासाची झलक आकाशात साकारण्यात आली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना सर्वप्रथम ‘सिडको’ने मांडली होती. त्यानंतर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर  याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत आजपासून सुरू झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button