ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत परिवर्तनाचा नारा : “प्रश्न अनेक… उत्तर एकच – प्रा. कविता आल्हाट”

घराघरांतून मिळतोय विश्वासाचा प्रतिसाद; विकासाच्या मुद्द्यांवर प्रचारात आघाडी

Share On

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रा. कविता आल्हाट यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, त्यांच्या प्रचारामुळे परिसरात सकारात्मक आणि परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रश्न अनेक… उत्तर एकच – प्रा. कविता आल्हाट” या ठोस आणि प्रभावी घोषवाक्यासह त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे.

प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांचे प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या असंख्य प्रश्नांवर विश्वासार्ह आणि सक्षम उत्तर देणारे नेतृत्व म्हणून मतदार प्रा. कविता आल्हाट यांच्याकडे पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

घराघरांत जाऊन थेट संवाद साधत त्या नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, समस्या सोडवण्यासाठी ठोस नियोजन मांडत असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढत आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि अभ्यासू नेतृत्व या बळावर त्यांनी प्रचारात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा       :            मेट्रो स्थानक येथे मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य व फ्लॅश मॉब

प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्गामध्ये त्यांच्या प्रचाराची विशेष चर्चा असून, “प्रश्न ऐकून घेणारी, उपाय सांगणारी आणि काम करून दाखवणारी नेत्या” अशी प्रतिमा प्रा. कविता आल्हाट यांनी अल्पावधीतच निर्माण केली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम यश मिळवून देण्यात प्रा. कविता आल्हाट यांचा प्रचार निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझ्यासाठी वैयक्तिक जबाबदारी आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, महिला व युवकांचे प्रश्न याकडे केवळ तक्रार म्हणून नाही, तर तातडीने सोडवायची जबाबदारी म्हणून मी पाहते. निवडून आल्यावर केवळ आश्वासनं न देता, आधुनिक नियोजन, पारदर्शक कामकाज आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा माझा ठाम संकल्प आहे.

– प्रा. कविता आल्हाट, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्रमांक- २.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button