Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’! वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघ अध्यक्षांची निर्घृण हत्या

सांगली | सांगली जिल्ह्यात दलित महासंघाच्या मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा खून करण्यात आला असून, ही घटना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील दृश्यांची आठवण करून देणारी ठरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे.

उत्तम मोहिते हे दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घराजवळच केक कापण्याचा आणि जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

हेही वाचा     :          मिशन PCMC : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचे ‘‘गुडलक’’

याच दरम्यान, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख या युवकाने अचानक हल्ला चढवला. मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहिते यांना तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्याचाही मृत्यू झाला. घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button