Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन PCMC : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचे ‘‘गुडलक’’ 

भोसरी मतदार संघात भाजपाच्या जागा वाढणार : पिंपरी-चिंचवडमधील भाजपाची दुसऱ्या टप्प्यावर आघाडी

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केली. या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजे प्रभाग रचना… आणि त्यामध्ये भाजपाने आपले सोईचे प्रभाग करुन घेतले आहेत, असा दावा करण्यात आला होता. त्यावर हरकती आणि सूचनाही घेण्यात आल्या. मात्र, निवडणूक विभागाने त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर आता आरक्षण सोडतीमध्येसुद्धा भाजपाचे ‘गुडलक’ दिसून आले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर ही निवडणूक होणार आहे. 2017 मध्ये 128 पैकी 77 नगरसेवक भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शहरातील पकड आणखी मजबूत केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अस्थित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी आजच्या घडीला सर्वाधिक बलाढ्य आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्यामुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी प्रभाग रचनेवर अप्रत्यक्ष ‘कंट्रोल’ ठेवला. त्यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचे बहुसंख्य प्रभाग ‘सेफ’ झाले आहेत. किंबहुना, ‘‘देवाच्या काठीचा आवाज होत नाही’’ या म्हणीप्रमाणे काही उपद्रवी उमेदवारांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. 

पिंपरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे तीव्र इच्छुक होते. मात्र, प्रभाग 19 मधील जागा महिलांसाइी राखीव झाली आहे. त्यामुळे त्यांना अन्य ठिकाणी उमेदवारीची चाचपणी करावी लागणार आहे. शहराच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या सीमा सावळे, सुलक्षणा शिलवंत, चंद्रकांत सोनकांबळे यांच्यासह अश्विनी वाघमारे, कमल घोलप, अश्विनी बोबडे, गिता मंचरकर, शारदा सोनवणे, माधुरी राजापुरे यांच्या प्रभागांमध्ये पुरूषांचे आरक्षण पडले आहे. मंगला कदम आणि यशोदा बोईनवाड यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांना खुल्या गटातून लढावे लागणार आहे. शाहुनगर-संभाजीनगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे केशव घोळवे यांची अडचण झाली आहे. विशेष म्हणजे, 2017 मध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षीत जागेवर निवडून आलेल्या 5 इच्छुक दावेदारांना आता घरी बसावे लागणार आहे. 

प्रभाग 30 मध्ये सर्व जागा आरक्षित झाल्यामुळे या प्रभागात खुल्या गटातील इच्छुकांची कोंडी होणार आहे. ओबीसी जागा महिलांसाठी राखीव नाही. त्यामुळे नगरसेविका आशा शेंडगे यांची कोंडी झाली आहे. 

प्रभाग रचना, आरक्षण सोडतीच्या ‘गुडलक’मुळे भाजपाच्या जागा वाढणार..! 

भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 12 प्रभागांमध्ये झालेल्या आरक्षण सोडती भाजपासाठी ‘पॉझिटिव्ह’ आहेत. तळवडे गाव प्रभागामध्ये प्रभाग रचनेत ताम्हाणे वस्तीचा भाग तोडण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांचे पॅनेल डिस्टर्ब झाले आहे. त्यांना पॅनेल पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. प्रभाग- 1 मध्ये यश साने आणि विकास साने लढणार आहेत. तसेच, प्रभाग 12 मधून या प्रभागात आलेल्या संगीता ताम्हाणे असे तीन इच्छुक आहेत. त्या ठिकाणी अन्य स्थानिक इच्छुकांची संख्या जास्त आहे. मग, संधी कोणाला मिळणार? असा प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत बोराटे एकाकी झाले आहेत. कारण, या ठिकाणी राष्ट्रवादीकडून इच्छुक प्रा. कविता आल्हाट, रुपाली आल्हाट, आतिष बारणे, विशाल आहेर असे इच्छुक आहेत. पक्षाकडून दिलेला उमेदवार आणि वसंत बोराटे यांना अपेक्षीत असलेला उमेदवार यामध्ये मतभिन्नता आहे. 

प्रभाग 3 मध्ये एससी आरक्षण पडले आहे. इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रभाग- 4 मध्ये गायकवाड-घुले भाजपासोबत आहेत. राष्ट्रवादीचे पॅनेल सक्षम नाही. प्रभाग- 5 हा अजित गव्हाणे यांचा स्वत:चा प्रभाग आहे. या ठिकाणी पॅनेल सक्षम करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. प्रभाग-6 मध्ये रवि लांडगे यांची भूमिका स्पष्ट नाही. प्रभाग- 7 मध्ये पॅनेल पूर्ण होत नाही. प्रभाग- 8 मध्ये एकच ओपन पुरूष आहे. त्यामुळे विक्रांत लांडे किंवा राजेंद्र वाबळे यांपैकी एकाला माघार घ्यावी लागणार आहे. सीमा सावळे यांना पुरुष गटातून लढावे लागणार आहे. 

प्रभाग- 9 मध्ये एससी खुला झाला आहे. त्यामुळे राहुल भोसले आणि समीर मासुळकर यांना एकमेकांसमोर लढावे लागेल किंवा महिला उमेदवार द्यावा लागणार आहे. प्रभाग- 11 मध्ये एससी पुरूष झाल्यामुळे कंदन गायकवाड यांना संधी मिळाली आणि निलेश नेवाळे सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या संजय नेवाळे किंवा सचिन सानप यांच्यासाठी सोपी लढाई नाही. प्रभाग- 13 मध्ये भाजपाकडून उत्तम केंदळे आणि बापू घोलप उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाला एक जागा सुलभा उबाळे सोडू शकते. त्यामुळे या प्रभागात तडजोडीचे राजकारण न करता एकमेकांसमोर लढावे लागणार आहे. काही पक्षप्रवेश झाले, तर राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत.  

महापालिका निवडणूक प्रभाग रचना आणि त्यानंतर झालेली आरक्षण सोडत याच्यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घायाळ झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. भोसरी मतदार संघात झालेली प्रभाग रचना आणि आरक्षण यांचे ‘गुडलक’ भाजपाकडे आहे. त्यामुळे भाजपाकडे इच्छुकांची मांदियाळी, तर राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे 2017 मध्ये मतदार संघात 48 पैकी 33 जागा मिळवलेल्या भाजपाकडे या निवडणुकीत जागा वाढतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

2017 प्रमाणे झालेली प्रभाग रचना, भाजपातील इच्छुकांच्या मनासारखे आरक्षण आणि उमेदवारांची मांदियाळी पाहता आजच्या घडीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता पुन्हा येईल, असे स्पष्ट मत राजकीय जाणकार समाजमांध्यमांवर मांडताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button