Positive News : पुनावळेतील गायकवाड नगरमध्ये रस्त्याचे काम पूर्ण!
स्थानिक नागरिकांमध्ये समाधान : आमदार शंकर जगताप यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड : पुनावळे परिसरातील गायकवाड नगर (प्रदीप स्वीट्स ते जी.के. आरकॉन रस्ता) येथील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, या कामासाठी आमदार शंकर जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
भाजपाचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राहुल काटे यांनी परिसरातील रहिवाशांच्या वतीने सदर रस्त्याचे काम मार्गी लावणे बाबत आमदार शंकर जगताप यांच्याकडे मागणी केली होती.
हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये रविवारी विविध कार्यक्रम

सुरुवातीच्या टप्प्यात रस्त्याच्या कामात अनियमितता, अर्धवट पायाभरणी आणि गुणवत्तेचा अभाव दिसून आला होता. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करून महानगरपालिकेकडे निवेदन दिलं होतं. तसेच आमदार शंकर जगताप यांना लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. याची दखल आमदार जगताप यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
राहुल काटे यांनी सांगितले की, “रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी सातत्याने मागणी केलेली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना व वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत आमदार शंकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासन यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. याबाबत आमदार जगताप यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. नवीन रस्त्यामुळे आता परिसरात धूळमुक्त आणि सुरक्षित वाहतुकीस चालना मिळाली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पुनावळे परिसरातील गायकवाड नगर (प्रदीप स्वीट्स ते जी.के. आरकॉन रस्ता) येथील रस्त्याच्या चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले असून नागरिकांची होणारी गैरसोय कमी झाली आहे. आगामी काळात पुनावळे परिसरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांना प्रशस्त करण्याचा संकल्प आमदार जगताप यांनी केला आहे. याबाबत पुनावळेकरांच्या वतीने आमदार जगताप यांचे आभार व्यक्त करतो.
– राहुल काटे, सामाजिक कार्यकर्ते, भाजपा.




