Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमानाचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्धाटन

नाशिक : अत्याधुनिक लढाऊ तेजस लढाई विमानाचे आज उद्घाटन झाले आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान भारतीय हवाई दलात होणार दाखल. केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सर्वात हलके लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता. भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस गौरवाचा आहे. तेजस LCA Mk1A हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम.50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता.

सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून सुरक्षित रडार प्रणाली. CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य. SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते. EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करावी

SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती. हवेतच इंधन भरण्याची आधुनिक सोय उपलब्ध. डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण. आत्मनिर्भर भारताच्या वायुदलाची तांत्रिक ताकद दर्शवणारे प्रतिक आहे. 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने हवाई दलासाठी 97 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली.

तेजस LCA Mk1A हे भारतात बनवलेले अत्याधुनिक हलके लढाऊ विमान आहे. ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजेच सुमारे 2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास सक्षम. 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान. AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य. राजनाथ सिंह हे दोन दिवसी नाशिक दाैऱ्यावर आहेत. नाशिकमध्येच ते मुक्कामी देखील होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button