Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

वाचन प्रत्येकासाठी कौशल्य वाढविणारे उत्तम व्यासपीठ!

शिक्षण विश्व: एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड : पुस्तके म्हणजे चालते फिरते ज्ञानाचे व्यासपीठ आहे. पुस्तकांचे वाचन प्रत्येकासाठी कौशल्य वाढविणारा एक उत्तम व्यासपीठ आहे असे मत संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य समाधान निकम यांनी व्यक्त केले.

माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात वैज्ञानिक ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा करण्यात येणारा “वाचन प्रेरणा दिवस” एम आय टी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग तसेच सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अंतरमहाविद्यालयीन बुक टॉक स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची जाणीव निर्माण करणे, वाचनाची आवड वाढवणे आणि वाचनाच्या माध्यमातून वैचारिक व व्यक्तिमत्त्व विकास घडवणे हा होता. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी भगवद्गीता, इंग्रजीतील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके तसेच विविध प्रेरणादायी ग्रंथांवर आधारित विचार प्रभावीपणे मांडले.

परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण, आत्मविश्वास, विषयज्ञान, भाषाशैली आणि प्रभावी मांडणी या पाच निकषांवर मूल्यांकन केले. स्पर्धेत दिया चौधरी प्रथम, श्रीप्रिया पिल्ले द्वितीय तर महेश खताने तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार, एक हजार आणि पाचशे रुपयांची रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा –  “डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन रशियाबाबत कुठलीही चर्चा नाही”, भारताने ‘तो’ दावा फेटाळला

स्पर्धेचे मूल्यमापन संत ज्ञानेश्वर बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य समाधान निकम यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, बुक टॉक म्हणजे वाचलेल्या पुस्तकातील विचार, कथानक, पात्रे आणि प्रेरणादायी संदेश प्रभावीपणे आपल्या शब्दांत सादर करणे. हा उपक्रम वाचनाची आवड निर्माण करणारा आणि सादरीकरण कौशल्य वाढविणारा एक उत्तम व्यासपीठ आहे.

कार्यक्रमाचे स्वागत भाषण महाविद्यालयाचे संचालक बी बी वाफारे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात वाचनाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करताना नमूद केले की.वाचन हा केवळ अभ्यासाचा भाग नसून जीवन समृद्ध करणारा आत्मानुभव आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयत संकर, श्रावणी नेहरकर आणि शरण्या नायर (कॉम्प्युटर सायन्स – प्रथम वर्ष) यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल राहुल बाराथे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बुक टॉक स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा जागवणारा एक सुंदर उपक्रम आहे. डिजिटल युगात वाचनाशी पुन्हा नाते जोडणे आवश्यक असून पुस्तक हे केवळ माहितीचेच नव्हे तर प्रेरणेचेही स्रोत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, भाषणकला आणि विचारमंथनाची सवय निर्माण होते.

या प्रसंगी संचालिका अक्षदा कुलकर्णी, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख संगीत बोर्डे आणि पदमवती उंडाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा कल्पना लामतुरे, रोहिणी पोकळे, सुवर्णा सानप आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button