रोहित-विराट परतले! ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय वनडे आणि टी-२० संघांची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहेत. पण यादरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेत याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकदिवसीय फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा ऐवजी शुबमन गिलला संधी दिली आहे.
२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाचे नेतृत्व करणारा रोहित आता वनडे कर्णधार राहणार नाही. कसोटीतील नेतृत्वानंतर गिलला आता एकदिवसीय फॉरमॅटमध्येही कर्णधार म्हणून संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. वनडे संघात रोहित, विराट, केएल राहुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांसारखे अनुभवी खेळाडू असून ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, हर्षित राणा यांसारख्या तरुणांनाही संधी मिळाली आहे.
दरम्यान, टी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. शुबमन गिल उपकर्णधार असेल. जसप्रीत बुमराह टी-२० संघात परतला आहे. रिंकू सिंह, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांसारखे खेळाडू संघात असून युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मेळ साधण्यात आला आहे.
हेही वाचा : Good News : महावितरणच्या मोशी शाखा विभाजनाला ‘‘हिरवा कंदिल’’
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.





