क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नीरज चोप्रा सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज

भालाफेकपटू नीरज चोप्राची, एका थ्रोमध्येच गाठली अंतिम फेरी

मुंबई : जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 बुधवार पुरुषांच्या भालाफेकीची पात्रता फेरी झाली. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने कमाल केली. अंतिम फेरीसाठी एकूण 12 स्थान असून अ आणि ब गट आहे. नीरज चोप्रा गट अ मध्ये होता. या गटात चांगली कामगिरी करून त्याने अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. अंतिम फेरीत नीरज चोप्राला फक्त एक थ्रोमध्ये जागा मिळाली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 84.85 मीटर अंतर पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पात्रतेसाठी 84.50 मीटर अंतर कापणं आवश्यक होतं. नीरजने पुन्हा थ्रो केला नाही. अंतिम फेरीसाठी त्याची ऊर्जा वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जर्मनीचा ज्युलियन वेबर देखील 87.21 मीटर थ्रो करून पात्र ठरला आहे. भारताचा सचिन यादव देखील या गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा करत होता. जेव्हा नीरजची पाळी आली तेव्हा त्याच्या ट्रेडमार्क शैलीत फक्त एका थ्रोने काम पूर्ण केले.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

ब गटात 18 जणांमध्ये ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम, अँडरसन पीटर्स, ज्युलियस येगो, लुईझ दा सिल्वा, रोहित यादव, यशवीर सिंग आणि उदयोन्मुख श्रीलंकेचा रुमेश थरंगा पाथिरागे यांचा समावेश असेल. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी या गटातून पात्र होणं आवश्यक आहे. अर्शद नदीम हा या फेरीतून पात्र झाला तर पु्न्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.

सचिन यादवने 80.16 मीटर, 83.67 मीटर, 82.63 मीटर असे तीन थ्रो केले. तो 84.50 मीटरचा पात्रता मार्क ओलांडू शकला नाही. ग्रुप अ मध्ये सहाव्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीसाठी टॉप 12 थ्रोअर्स पात्र ठरतात. तो पात्र ठरेल की नाही हे आता इतर स्पर्धकांवर म्हणजेच गट बवर अवलंबून आहे. पण नीरज चोप्रा पात्र ठरला असून त्याच्याकडून क्रीडाप्रेमींना सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button