‘अजित पवार यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त’; संजय राऊतांची टीका

‘अजित पवार यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त’; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on Ajit Pawar | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांचा बळी गेला आणि त्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या जखमांवर अजूनही मलमपट्टी झालेली नसताना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याच्या निर्णयावरून शिवसेना (यूबीटी) ने आज राज्यभरात ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन उघडले. या आंदोलनादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा विशेष समाचार घेतला.

अजित पवार काय म्हणाले?

खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे की नाही बघावे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचे निमित्त विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये, असे माझे आवाहन आहे, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा         :            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी

अजित पवारांच्या विधानावर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या २६ लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या २६ लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता.

एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पक्ष नसून अमित शाह यांची छोटी कंपनी आहे. तात्पुरत्या स्वरुपात शेअर बाजारात टाकलेला माल आहे. देशाच्या आज भावना काय आहेत आणि ही लोक काय बोलत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, भारतीय क्रिकेट संघालाही आजचा सामना खेळायचा नाही. काही क्रिकेटपटूंशी आमचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद झाला असून त्यांचा या सामन्याला विरोध आहे. मात्र त्यांची अडचण असल्यामुळे त्यांना सामना खेळावा लागत असल्याचा दावा, असंही संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *