युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला, जगभरात चिंता वाढली

Russia Ukraine War | युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता आणखी धोकादायक वळणावर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनने थेट रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या बातमीने जगभरात मोठी खळबळ उडाली असून अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांनीही नुकतेच एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की जोपर्यंत खरी शांतता मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील. या युद्धामुळे युक्रेन कमजोर नाही तर आणखी मजबूत झाला आहे. या विधानातून त्यांनी भविष्यात हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : Pune | सिंहगडावरुन बेपत्ता झालेला तरुण अखेर चार दिवसांनी सापडला
या हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले? याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार हल्ल्यानंतर आग लागली होती, ती लगेचच विझवण्यात आली. या घटनेमुळे जगभरातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जर हे युद्ध असेच सुरू राहिले तर केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जगाला ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या युद्धामुळे आता परिस्थिती फक्त रशिया आणि युक्रेनपुरती मर्यादित राहिलेली नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी कोणतेही पाऊल उचलताना पूर्ण विचार करावा असे आवाहन केले जात आहे. अणुऊर्जा प्रकल्पावर झालेला हा ड्रोन हल्ला पाहता आता तणाव आणखी वाढला असून जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




