Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

उद्योगभिमुख शिक्षण देण्याची गरज; संदीप कदम

शिक्षण विश्व: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या एआय इंटरनॅशनल इनोवेशन लॅबचे उद्घाटन

पिंपरी | विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योगभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. आगामी काळ हा तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा आहे. भविष्यातील ही गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा मानस असल्याचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेटर सदस्य संदिप कदम यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव येथे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील पहिल्या ए आय इंटरनॅशनल इनोवेशन लॅबचे उद्घाटन संस्थेचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेटर सदस्य संदिप कदम यांनी केले.

विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योगभिमुख शिक्षण देण्याची तयारी या एआय इनोवेशन लॅबच्या माध्यमातून केली जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दूरदृष्टीने संस्थेत सुरू असलेल्या उपक्रमांचा व वाटचालीचा आढावा घेतला तसेच संस्थेच्या अनेक शाखांमध्ये भविष्यात एआय लॅब सुरू करुन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे असे सांगितले.

हेही वाचा     :      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी परिसरात वृक्षारोपण मोहीम उत्साहात

वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रकला, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयातील हॉकी क्लब, स्काऊट गाईड व ढोल पथकाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी एअर गुरूजी इंटरनॅशनलचे सीइओ प्रताप पवार, प्रशासकीय अधिकारी राजेन्द्र खवले , मुख्याध्यापक शैलजा गायकवाड, उपमुख्याध्यापक संध्या गायकवाड, पर्यवेक्षक एस.डी. चव्हाण, राजाराम बापू पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री मुंढे आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील लाडके, सूत्रसंचालन उमेश घुंडरे तर उपस्थित सर्वांचे आभार एस डी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या निमित्ताने एस एस सी व एच एस सी परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या मुलांचा तसेच हॉकी फेस्टिव्हलमध्ये विजयी झालेल्या हॉकी टिमचा सत्कार करण्यात आला निर्माण संस्थेच्या वतीने मा मानद सचिवांना हॉकी स्टिक भेट देण्यात आली. इयत्ता सातवी आणि आठवीच्या मुलांसाठी रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर व ड्रोन कॅमेरा या विषयावर सेशन घेण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button