Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

..तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन; माणिकराव कोकाटे

मुंबई | महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कोकाटे सभागृहात लक्षवेधी चर्चा सुरू असताना मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना दिसत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले, की मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. तो फार किरकोळ विषय आहे. मात्र, त्याची इतकी चर्चा का होतेय तेच मला कळत नाहीये.

हेही वाचा    :      राज्यात त्रिभाषा सूत्र कायम राहणार, हिंदीच्या सक्तीवर केंद्रांची भूमिका समोर

मी याआधीच त्यावर खुलासा केला आहे. तुम्हा लोकांना ऑनलाइन रमी हा काय प्रकार आहे ते माहिती आहे का? असा गेम खेळताना तुम्हाला तुमचा फोन नंबर व बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करावी लागते. हा गेम आल्यापासून ते आतापर्यंतची माहिती तुम्ही तपासा. माझा नंबर किंवा बँक खातं अशा गेमशी संलग्न आहे का ते तपासा. मी तुम्हा प्रसारमाध्यमांना माझा फोन व बँक खाते क्रमांक देतो. तुम्ही चौकशी करा, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.

हा गेम सुरू झाल्यापासून आतापर्यंत मी एक रुपयाचीही रमी खेळलेलो नाही. मुळात मला रमी हा गेम खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी करणं चुकीचं आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर असे खोटे आरोप केले आहेत. त्यांना मी कोर्टाच खेचल्याशिवाय राहणार नाही, असं कोकाटे म्हणाले.

मी सभागृहात रमी खेळलो असं वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी यामध्ये दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या नागपूर अधिवेशनात (हिवाळी) यावर निवेदन दिलं. तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन, असंही माणिकराव कोकाटे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group