Breaking-newsताज्या घडामोडी

रेल्वेच्या नियमांमध्ये १ जुलैपासून मोठे बदल! प्रवास महागणार, तात्काळ तिकिटांसाठी आधार सक्ती

Railway New Rules | भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचे बदल जाहीर केले असून, १ जुलै २०२५ पासून प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ आणि तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये सुधारणा लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम लाखो रेल्वे प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.

रेल्वे भाडेवाढ:

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटात प्रति किलोमीटर १ पैसा, तर एसी क्लासच्या तिकिटात प्रति किलोमीटर २ पैसे वाढ होणार आहे. मात्र, ५०० किलोमीटरपर्यंतच्या दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासासाठी आणि मासिक सीझन तिकिटांमध्ये (MST) कोणतीही दरवाढ होणार नाही. ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी नॉन-एसी तिकिटांमध्ये प्रति किलोमीटर ०.५० पैसा अतिरिक्त आकारला जाईल. उदाहरणार्थ, मुंबई ते दिल्ली (१४०० किमी) नॉन-एसी प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे १४ रुपये जास्त मोजावे लागतील.

हेही वाचा     :      Maharashtra Weather | राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

तात्काळ तिकिटांसाठी आधार सक्ती:

तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कालाबाजारी रोखण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२५ पासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार सत्यापन अनिवार्य असेल. केवळ आधार-व्हेरिफाइड आयआरसीटीसी खात्यांद्वारेच ऑनलाइन तिकीट बुक करता येईल. याशिवाय, १५ जुलैपासून तात्काळ तिकिटांच्या ऑनलाइन आणि काउंटर बुकिंगसाठी आधार-आधारित ओटीपी पडताळणी देखील बंधनकारक होईल. यामुळे फसवणूक आणि दलालांच्या कृत्यांना आळा बसेल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group