Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

मुकेश अंबानी– गौतम अदानी इंधन विक्रीसाठी एकत्र

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी इंधनपुरवठा क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार अंबानी यांच्या जिओ बीपी या पेट्रोल आणि डिझेल पंपावरून अदानी यांच्या सीएनजी गॅसचे वितरण केले जाणार आहेत. तर अदानी यांच्या सीएनजी गॅस केंद्रावरून जिओ बीपीच्या पेट्रोल आणि डिझेलचे वितरण केले जाणार आहे.

जिओ बीपीकडे देशभरात 1,972 पेट्रोल पंप आहेत. तर अदानीी यांची 650 सीएनजी स्टेशन आहेत. या नेटवर्कचा दोन्ही कंपन्यांना लाभ व्हावा म्हणून हे सहकार्य करण्यात येत आहे. दरम्यान जीओ सुरु करण्याच्या निर्णयाला मुकेश अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जाखीम म्हटले आहे.

हेही वाचा – मला भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही; एकनाथ खडसेंकडून पुन्हा महाजनांवर निशाणा

एका मुलाखतीत, मुकेश अंबानींनी सांगितले की, जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजने 4 जी मोबाईल नेटवर्क लाँच करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली, तेव्हा अनेक तज्ञांनी हे आर्थिक अपयश ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्यांच्या मते, भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नव्हता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button