Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्र्यांकडून नीतेश राणेंची खरडपट्टी! ‘बाप’ उल्लेखावर शिवसेना मंत्र्यांचा आक्षेप

मुंबई : ‘कोणी कितीही नाचले आणि ताकद दाखविली, तरी सगळ्यांचा ‘बाप’ म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे,’ या मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. ‘आमचा बाप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आहेत, तुमचा कोण? असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. त्यानंतर ‘बाप’ उल्लेख चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत फडणवीस यांनी राणेंना खडसावले.

नीतेश राणेंच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले होते आणि फडणवीस यांनी त्यांना समज दिली होती. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरून युतीमध्ये सध्या जुंपली आहे. प्रताप सरनाईक हे पालकमंत्री असून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी समितीच्या निर्णयांबाबत तक्रार केली होती. यासंदर्भात राणे यांनी सर्वांचा ‘बाप’ भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे, असा इशारा शिवसेना नेत्यांना दिला होता. त्यावरून शिवसेना मंत्र्यांनी फडणवीस यांच्याकडे तीव्र आक्षेप घेतला. तेव्हा ‘बाप’ उल्लेख करणे योग्य नाही, असे नमूद करून राणे यांच्याशी मी बोललो असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – WTC फायनल पाऊस किंवा ड्रॉमुळे सामना अनिर्णित राहिल्यास काय होईल? जाणून घ्या ICC चे नियम

माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, असा खुलासा राणे यांनी केला. पण तुमच्या मनात जो अर्थ असेल, त्यापेक्षा वेगळा अर्थ किंवा समज (परसेप्शन) दुसऱ्यापर्यंत जात असेल, तर राजकारणात ते सांभाळणे महत्त्वाचे असते, असे मी राणे यांना सांगितल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राणे यांनी जपून बोलावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button