ताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे गट आणि मनसे युती होण्याची शक्यता

पुण्यात आदित्य-राज ठाकरेंचे एकत्र बॅनर!

मुंबई : राज्यात सध्या युती आणि आघाड्यांचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांचे एकत्रिकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही गट एकत्र आले तर चांगलेच होईल, असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही बंधूंच्या युतीच्याही चर्चा आहेत. असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांत एक नवा उत्साह संचारला आहे. त्याची प्रचिती पुणे येथे आली आहे. राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पुण्यात चौका-चौकात झळकले बॅनर्स

महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसैनिक तसेच मनसे सैनिकांत या संभाव्य युतीबाबत मोठी उत्सुकता आहे. त्याचीच प्रचिती पुण्यात आली. येथे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकाकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आला आहेत. आज (9 जून) राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. असे असताना पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका-चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आतापासूनच मनाची तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –  राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी याला युतीला समर्थन दिले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच होईल. संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असे वाटते, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर आता भूतकाळात डोकावून पाहायचं नाही. समोर भविष्यकाळाकडे पाहायचं असं म्हणत उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत, असं थेट आणि उघडपणे बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button