‘पहलगाम भ्याड हल्ला असंवेदनशील’; डॉ.दीपक शहा
शिक्षण विश्व: चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : जम्मू काश्मीर येथील पहलगाम भ्याड हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे. अशा प्रकारच्या घटना निषेधार्थ असून या हल्ल्यांमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करण्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आम्ही आहोत अशा भावना कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा – ‘राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) मध्ये श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांनी संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करत शोकाकुल परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असा संवेदना यावेळी व्यक्त केल्या. संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा , संचालिका तेजल शहा समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, सीबीएसईच्या प्राचार्या वृंदा जोशी ,लिजा सोजू , बीएडच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम,हितेन करानी , तृप्ती शहा समवेत विभाग प्रमुख , प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग , विद्यार्थी, सेवक , सेविका आदीं उपस्थित होते.





