नागपूरच्या महाल भागात हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत
आरोपींच्या घराचा काढणार सातबारा

नागपूर : गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी उत्तरप्रदेशात आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची वादग्रस्त कारवाई केली जाते. अशाच प्रकारे महालमध्ये झालेल्या हिसांचारात पोलिसांकडून कारवाईची शक्यता असून आरोपींच्या घराचा सातबारा काढण्यात येत आहे.
महालमधील हिंसाचारात पोलिसांनी दहा गुन्ह्यांमध्ये ९१ जणांना अटक केली आहे. त्यातील अकरा आरोपी अल्पवयीन आहेत. त्यातील काही आरोपींचे कनेक्शन नेमके कुठे आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.
विशेष म्हणजे, हिंसाचारातील मुख्य आरोपी मायनॉरिटी डेमॉक्रटीक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यानंतर या प्रकरणात अजूनही काही आरोपी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
हेही वाचा – बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यांची लायकी तीच आहे, आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, त्यांनी काल ज्या पद्धतीनं माझ्यावर ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडं-वाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातले आधीचे सगळे बोलून -बोलून थकले. आता हे सुरू झाले आहेत. मला प्रश्न असा पडला आहे की हे आणखी किती वर्ष प्रश्न विचारणार. माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने बोललं जातं. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही काय समजता स्वत: ला. तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे.





