Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लष्कराचे संचलन

Republic Day 2025 : आज देश 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर तिरंगा फडकवला. यावेळी राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी देण्यात आली. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सुद्धा यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, कर्तव्य पथावरील परेडचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यंदा ‘गोल्डन इंडिया: हेरिटेज अँड डेव्हलपमेंट’ या थीमवर विविध राज्ये आणि सेवांची 31 झलक दाखवण्यात येणार आहेत.

हेही वाचा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट देऊन या उत्सवाला सुरुवात झाली. येथे त्यांनी शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात समारंभाच्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. ध्वजारोहणानंतर आता परेडला सुरूवात झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button