थोपटेंच्या कट्टर समर्थकाचा दादा गटात प्रवेश; भोर काँग्रेसला मोठे खिंडार

पुणेः राज्यातील विधानसभा निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा परफारमर्न्स चांगला राहिला. भोर विधानसभेवर गेले तीन टर्म या मतदार संघाचे नेत्वृत्व करणारे मा. आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादी पक्षाचे शंकर मांडेकर आमदार म्हणून निवडून आले. भोर विधासभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मांडेकर यांनी मोठ्या मताधिक्याने थोपटे यांच्या विरोधात विजय मिळवला. त्यामुळे भोर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यातच काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आल्यानंतर मा. आमदार संग्राम थोपटे यांचे एकनिष्ठ असलेले जिल्हा परिषदेचे मा. सदस्य अमोल नलावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
हेही वाचा – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन
त्यामुळे अजित पवार यांची ताकद वाढली असल्याचे पाहिला मिळत आहे. अमोल नलावडे हे भोर तालुक्यातील कुरण खुर्द विंझर गटातून २०१७ साली जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून निवडून आले होते. याचबरोबर त्यांच्या पत्नी वसुधा अमोल नलावडे या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आलेल्या आहेत. सलग दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्या घरात आहे. त्यांच्या भागात अनेक विकासकामे केली असल्याने लोकांमध्ये ते चांगले परिचयाचे आहेत. नलावडे हे मा. आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. भोर विधानसभा मतदार संघात त्यांचे पक्षाच्या वाढीसाठी चांगले संघटन राहिलेले आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत थोपटे यांच्या विजयात नलावडे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्यासोबत अन्य कार्यकर्त्यांनी देखील आपली हाती घड्याळ घेतले आहे.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे येत्या काही महिन्यात या निवडणुका होणार असल्याचे सांगितले जात आहे. ओबीसी आरक्षणा प्रकरणी सर्वाच्च न्यायालय २२ जानेवारी रोजी आपला निर्णय देणार असल्याची शक्यता आहे. या निडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक राजकीय गोठ्यात पडद्याआड हालचाली सुरू झालेल्या आहेत.





