Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

दिघी : कोयता बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) दुपारी चऱ्होली बुद्रुक येथे करण्यात आली.

आकाश नंदू पठारे (वय 23, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा    –      ‘‘मावळ माझा’’चे संपादक विशाल विकारी यांना राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलासमोर एक तरुण शस्त्र घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकाश पठारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button