Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत मोठा बदल; आता पालकांना करावा नाही लागणार खर्च!

नागपूर | राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली असली तरी सुसूत्रतेअभावी ती फसली. त्यामुळे राज्य सरकारने आता यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

कधी पासूनचालू हे बदल?

राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी २०२४-२५ पासून सुरू झाली. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णया स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे अनेक लोकांना रोजगार मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा      –      ‘मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही’; मंत्री नितेश राणेंचा राऊतांना टोला

बदल काय?

  • गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे.
  • थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापनाला निधीचे वाटप.
  • विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार.
  • स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत आणि नियमित गणवेश मिळतील.

– आय.ए. कुंदन, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button