ताज्या घडामोडीपुणे

विजय दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिर व उत्कृष्ट छात्र सैनिक पुरस्कार वितरण कार्यक्रम

पुणेः  मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, स. प. महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी विजय दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी साडे आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत या वेळेत स.प.महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होईल. या विशेष प्रसंगी १९७२ च्या युद्धातील ज्येष्ठ युद्धवीर यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.

तसेच याच दिवशी सकाळी ११.३० वाजता अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि स.प.महाविद्यालय, येथे विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मेजर एच डी मांजरेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार एनसीसी कॅडेट्सना प्रदान केला जाईल.

सर्व नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group