ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

दहा वर्षांनंतर सुरभी हांडे पुन्हा एकदा म्हाळसाच्या भूमिकेत

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेमध्ये एण्ट्री

महाराष्ट्र : महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे.

चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.’आई तुळजाभवानी’ मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचं रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल.

याविषयी सुरभी हांडे म्हणाली, 10 वर्षांनंतर म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता ‘आई तुळजाभवानी’ या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.

सुरभी पुढे म्हणाली, “‘आई तुळजाभवानी’सह म्हाळसा जेव्हा असुरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं. तिचंही कौतुक वाटलं.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button