राज्यातील ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Election Results | राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अशातच नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी मान्य झाली आहे.
सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे सुधाकर बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत’; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना ७३ हजार ६५१ मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला ४६ हजार ६४९ मते मिळाली आहेत.




