ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
भोसरी मतदार संघातील आजारी/दिव्यांग / अंध मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
मोफत अॅम्ब्युलन्सची सोय, कै.सौ. हिराबाई किसनराव लांडगे कौशल्य विकास केंद्र व स्वराज्य प्रतिष्ठान चिखली या सामजीक संस्थेमार्फत स्तुत्य उपक्रम

भोसरीः कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे कौशल्य विकास केंद्र व स्वराज्य प्रतिष्ठान चिखली या सामजीक संस्थेमार्फत भोसरी मतदार संघातील आजारी/दिव्यांग / अंध मतदारांसाठी मतदानाचा हक्क बाजवता यावा म्हणून मोफत अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आलेली होती.सदर मोफत अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ भोसरी मतदार संघातील बहूसंख्य आजारी/दिव्यांग / अंध मतदारांनी घेत आपला मतदानाचा हक्क बजावला.
सदर सेवेमुळे बेडवर असलेले डॉ. सुधाकर फडके वय वर्षे ८६ यांनी चिखली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी संस्थेच्यावतीने अॅड. विशाल विश्वास डोंगरे, गणेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते जितूभाऊ यादव, अॅड. नवनाथ जगताप, अॅड. राजेश डोंगरे, संतोष फडके, ॲम्ब्युलन्स चालक चितळे यांची प्रामख्याने उपस्थिती होती.





