Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘औंध, मॉडेल कॉलनीच्या विकासासाठी पुढाकार’; सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय बाळगून गेल्या पाच वर्षांत मनापासून काम केले आहे. औंध, मॉडेल कॉलनी, बोपोडी अशा विविध भागांतील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दिशेने भरीव प्रयत्न केल्याची भावना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळे मतदारसंघात सर्वत्र मतदारांच्या भेटी घेत असून, नुकतीच त्यांनी औंध येथील प्रीझम सोसायटी, वेस्टर्न रिव्हर व्ह्यू सोसायटी, सेल्वेन हाइटस सोसायटी, निर्मिती होरिझोन सोसायटी यासोबतच दीप बंगला चौक, मित्रनगर कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली.

स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कुटीर रुग्णालयात सोयीसुविधा, जगदीशनगर, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत येथे हायमास्ट दिवे, बॉडी गेट पोलीस लाइन, इंदिरा वसाहतीत विद्युत तारा भूमिगत करणे, औंधमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, अशा कामांचा समावेश आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

हेही वाचा      –        ‘दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा’; शरद पवारांचा हल्लाबोल 

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक स्मारक, मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटरची दुरुस्ती, भोसलेनगर येथे महावितरणचे रिंग मेन युनिट बसवणे, नॉव्हेल्टी हेरिटेज को-ऑप. हाउसिंग सोसायटी येथे भूमिगत केबल टाकणे, ही कामेही मार्गी मागील पाच वर्षांत मार्गी लागली आहेत, तसेच गणेश सोसायटी, खाऊ गल्ली लेन, हर्डीकर हॉस्पिटल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

आनंद यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी येथील लकाकी तळे रोड आणि अन्य भागात ड्रेनेज लाइन टाकल्या असून, आणखी खूप काही करायचे असल्याचेही शिरोळे म्हणाले. या परिसरासाठी येत्या काळात शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांसाठी खुली करणे आणि इतर मैदाने सुसज्ज करणे, मेट्रो स्थानकांपर्यंत येण्या-जाण्यासाठी फीडर बस आणि रिक्षासेवेची उपलब्धता, मॉडेल कॉलनी, औंध येथील पीएमपीएलच्या बसथांब्यांचे नूतनीकरण, ही कामे प्रस्तावित असून, लवकरात लवकर ती पूर्ण होतील, असे आश्वासन शिरोळे यांनी नागरिकांना दिले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button