Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आचारसंहितेत 31 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकी दरम्यान 15 ऑक्टोबरपासून 31 कोटी 77 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये 10 कोटी 92 लाख 25 हजार रुपये रोकड, 5 कोटी 2 लाख 57 हजार रुपयांचे 6 लाख 5 हजार लिटर मद्य, 58 लाख 81 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 8 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांचे सोने-चांदी मौल्यवान धातू, 6 कोटी 59 लाख 88 हजारांच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात भरारी पथके (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित असून संशयास्पद वाहने, वाहतूक आदीवर काटेकोर लक्ष ठेऊन कार्यवाही केली जात आहे. पोलीस, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आदी विभागांच्यावतीनेही कार्यवाही केली जात आहे.

– रोकड : 10 कोटी 92 लाख रूपये

– मद्य : ५ कोटी 2 लाख रूपये

– अंमली पदार्थ : ५८ लाख रूपये

– सोने-चांदी : ८ कोटी ६३ लाख रूपये

– माैल्यवान वस्तू : 6 कोटी 59 लाख

(15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत)

हेही वाचा –  सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा; भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा

कसबा पेठ मतदार संघात 2 लाख 9 हजार रुपयांचे 1 हजार 106 लिटर मद्य, 17 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 7 लाख 60 हजारांचा मुद्देमाल तसेच खडकवासला मध्ये 5 कोटी रुपये रोकड, 14 लाख 5 हजार रुपयांचे 6 हजार 15 लिटर मद्य, 16 लाख 60 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 18 लाख 42 हजार रुपयांच्या वस्तू असा 5 कोटी 49 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कोथरुडमध्ये 6 लाख 26 हजार रुपयांचे 1 हजार 773 लिटर मद्य, 2 लाख 48 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 71 हजार रुपयांच्या वस्तू असा 10 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय शिवाजीनगर मतदारसंघात 8 लाख 83 हजार रुपयांचे 5 हजार 405 लिटर मद्य, 2 लाख 89 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 3 लाख 81 हजार रुपयांच्या वस्तू असा 15 लाख 53 हजारांचा मुद्देमाल आणि हडपसर मतदारसंघात मध्ये 35 लाख 90 हजार रुपये रोकड, 10 लाख 52 हजार रुपयांचे 7 हजार 88 लिटर मद्य, 3 कोटी 18 लाख 61 हजार रुपयांच्या वस्तू असा 3 कोटी 65 लाख 3 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात 3 लाख 20 हजार रुपयांचे 1 हजार 795 लिटर मद्य, 12 लाख 45 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 89 हजार रुपयांच्या वस्तू असा 21 लाख 54 हजारांचा मुद्देमाल आणि वडगाव शेरी मतदारसंघात 50 लाख रुपये रोकड, 10 लाख 2 हजार रुपयांचे 5 हजार 547 लिटर मद्य, 6 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 4 लाख 67 हजार रुपयांच्या वस्तू असा 64 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 70 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पर्वती विधानसभा मतदार संघात जप्त करण्यात आला आहे. यात 2 लाख 88 हजार रुपयांचे 727 लिटर मद्य, 6 कोटी 60 लाख रुपयांचे मौल्यवान धातू, 7 लाख 46 हजार रुपयांच्या वस्तू यांचा समावेश आहे. आंबेगाव मतदार संघात सर्वात कमी किंमतीचा अर्थात 1 लाख 17 हजार रुपये रोकड, 3 लाख 91 हजार रुपयांचे 5 हजार 558 लिटर मद्य, 85 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group