Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सांगलीच्या चौफेर विकासासाठी गाडगीळ यांना विजयी करा’; डॉ. प्रमोद सावंत

सांगली : सांगलीचा आणखी गतीने चौफेर विकास करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांना सांगलीतून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत केले.येथे हॉटेल चालक-मालक असोसिएशन तसेच वकील संघटनेमार्फत मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यशाळा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सलग दहा वर्षे सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात रस्ते, पूल, ड्रेनेज अशी अनेक कामे केली आहेत. मागणीमुक्त आणि समस्यामुक्त सांगली हा त्यांचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा आहे. सांगली शहरासह मतदारसंघात एकही समस्या शिल्लक ठेवायची नाही, असा निश्चय त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सांगलीतील जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सांगलीच्या विकासाची सुरू झालेली ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ तिसर्‍यांदा आमदार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चित येणार आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे सुधीर गाडगीळ मुंबई आणि दिल्ली येथील सरकारच्या मदतीने सांगलीसाठी आणखी निधी आणतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे सांगलीजवळ लवकरच विमानतळ उभे राहील.

हेही वाचा    –      ‘धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात’; भावाची सभा रितेश देशमुखांनी गाजवली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सांगलीमध्ये ‘सिंगल विंडो क्लीयनर्स’ व्यवस्था असावी. हॉस्पिटॅलिटी कोर्स सुरू करावेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनांचाही सांगलीसाठी लाभ करून घेता येईल. त्यासाठी सुधीर गाडगीळ निश्चितच पाठपुरावा करतील. संजय परमणे आणि अ‍ॅड. बाळासाहेब देशपांडे यांची भाषणे झाली.हॉटेल चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार, लहू बडेकर, श्रीपाद कोमकर, आदित्य बावडेकर, मिलिंद खिलारे, युवा नेते गौतम पवार, उल्हास चिप्रे, योगेश कुलकर्णी, अशोक सावंत, सतीश कुंभार, रमेश शेट्टी, अ‍ॅड. कुंभार, अ‍ॅड. अमोल बोळाज, शैलेश पाटील, माधव कुलकर्णी, सर्जेराव मोहिते, प्रवीण गोंधळे तसेच बार असोसिएशन व हॉटेल चालक-मालक असोसिएशन सदस्य उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button