‘संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट’; शंभूराज देसाईंची टीका

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी राज्यात सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी चुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, की संजय राऊत यांच्याकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत, उगाचच एवढ्या मोठ्या अधिकार्यावर खोटे आरोप करू नये, अशा शब्दात संजय राऊतांना देसाई यांनी सुनावले आहे. दरम्यान टीका करत असताना त्यांचा उल्लेख चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असाही केला आहे.
हेही वाचा – ‘RCBने विराटला कर्णधार करू नये, कारण..’; माजी खेळाडूचं विधान
संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोलले ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हे हवेत विधान करत असतात, त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटानं काय सूत्र स्वीकारले हा त्यांचा त्यांचा विचार आहे. मात्र त्यांना त्यांच्या स्थानिक शिवसैनिकांना सोडून बाहेरच्यांना उमेदवारी द्यावी लागते. यावरूनच मूळ शिवसेना कोण आहे, निष्ठावंत कोण आहेत, हे यावरून सिद्ध होते. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील लोकांनी मुख्य शिवसेनेकडे आले पाहिजे, असंही शंभूराज देसाई म्हणाले.




