Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, ४ शिलेदारांचा समावेश

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन कांबळे- पाटील यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा    –    मनसे-शिवसेना एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले.. 

दरम्यान, पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पारनेरसाठी काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पारनेरमध्ये आता काशिनाथ दाते विरुद्ध राणी लंके असा सामना रंगणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button