Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! इंदापुरात आता नवा वाद वाढण्याची शक्यता

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकल्यानंतर इंदापूरमध्ये वाद रंगला असताना पुन्हा एकदा नवा वाद उभारण्याची शक्यता आहे. इंदापूर काँग्रेस भवनचा ताबा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. काँग्रेस भवन जोपर्यंत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी काँगेस पक्षाकडे केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार गटातील नाराज नेते आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने,  भरत शहा यांनी  हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे. आणि आता आमदार संजय जगताप यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा     –      ‘आमच्या लढ्याला यश’; टोलमाफीच्या निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काल आमदार संजय जगताप यांची बैठक झाली. त्यानंतर इंदापुरातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावनाचा मुद्दा पुढे केला. त्यानंतर आमदार संजय जगताप यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे जोपर्यंत इंदापूर पक्ष कार्यालय पुन्हा एकदा काँग्रेसला मिळत नाही. तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group