Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी एकाच इमारतीत अनेक शासकीय कार्यालये

पुणे :  शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची पायाभरणी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. कामगार भवन या प्रशस्त व दर्जेदार प्रशासकीय इमारतीमध्ये महामंडळ, विविध विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत.

यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कामगार उप आयुक्त अभय गिते आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  BIG NEWS : तळवडे येथील ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ला प्रशासनाचा ‘ग्रीन सिग्नल’

इमारतीत ही कार्यालये…

सद्यस्थितीत उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त पुणे विभागातील अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, बाष्पके संचलनालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, घरेलू कामगार मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळ ही कार्यालये पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. ही कार्यालये एकाच ठिकाणी येणार आहेत.

पुणे शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बंगला क्र.५, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर येथे हे कामगार भवन उभारण्यास मान्यता मिळाली आहे. याचा लाभ कामगार, त्यांचे प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी, विविध संघटना,विधीज्ञ तसेच कामगार विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणारा सर्वसामान्य कामगार, महिला व नागरिक यांना मिळणार आहे.

– शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button