Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘मोदी शक्तिशाली आहेत, पण देव नाहीत’; अरविंद केजरीवाल यांची टीका

नवी दिल्ली | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी विधानसभेत संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला. पंतप्रधान मोदी खूप शक्तिशाली आहेत पण देव नाहीत, असं ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले, मनीष सिसोदिया आणि मला इथे पाहून विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना दु:ख झाले असेल. मी नेहमी म्हणतो की पंतप्रधान मोदी खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर संसाधने आहेत, पण मोदी हे देव नाहीत. देव आपल्यासोबत आहे. मला न्यायालयाचे आभार मानायचे आहेत.

हेही वाचा    –    ‘गुजरातच्या गांडाभाईची महाराष्ट्राला गरज नाही’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणामुळे त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, मी विचारले की मला अटक केल्याने त्यांना कशी मदत झाली. त्यांनी मला सांगितले की त्यांनी मला अटक करून संपूर्ण दिल्ली सरकारला पायउतार केले. त्यांनी मला जे सांगितले त्याचे मला आश्चर्य वाटले. दिल्लीतील लोकांचे जीवन उद्ध्वस्त करून आनंद साजरा करणारा असा हा कोणता पक्ष आहे, याचे मला आश्चर्य वाटते, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

मला तुरुंगात पाठवून त्यांनी दिल्लीतील कामे बंद पाडली. रस्त्यांचीही दुरवस्था झाली. हा त्यांचा एकमेव हेतू होता. आज मी मुख्यमंत्री आतिषीजींसोबत दिल्ली विद्यापीठातील एका रस्त्याची पाहणी केली. हा रस्ताही लवकरच दुरुस्त केला जाईल, बाकीचे दिल्लीतील रस्तेही लवकरच दुरुस्त केले जातील, आता दिल्लीतील लोकांना काळजी करण्याची गरज नाही, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button