Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर? व्हिडीओ व्हायरल

Siddhivinayak Temple | प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिमध्ये एका ट्रेमध्ये सीलपॅक असलेले लाडू आहेत. परंतु, त्यातील एका पॅकमध्ये उंदरांची पिल्ले दिसत आहेत. अनेक भक्तांनी यावर संताप व्यक्त केलाय.

श्री सिद्धविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी या व्हिडीओतील दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, प्रसाद जिथे तयार केला जातो, ती जागा अत्यंत स्वच्छ असते. परिसर स्वच्छ ठेवण्याकरता आम्ही खूप प्रयत्न करतो. या प्रसादातील तूप, काजू मुंबई महानगर पालिकेच्या लॅबमध्ये टेस्ट करून आल्यावरच वापरतो. यासाठी वापरण्यात येणारं पाण्याचंही परिक्षण केलं जातं. जो प्रसाद आम्ही भक्तांना देतो, तो फार शुद्ध आहे ना याकडे आमचं लक्ष असतं. गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुठला आहे हे सध्या कळत नाहीय. पण याप्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. पण हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button