Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं! विद्यमान आमदाराचे तिकीट कापणार नाही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून 70 पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली त्यातून ही माहिती समोर आली आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  ‘राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला’; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची मागणी

2019 साली राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले होते. त्यात आणखी 15 जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली.

आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त 15 जागा वाढवून मागण्यांची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता 70 पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे. या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील 80 जागांवर दावा करण्याची तयारी होती. दरम्यान, आधीपासूनच महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि नंतर राष्ट्रवादीचा नंबर लागतो. अजित पवार गटाने 70 जागांवर दावा करत असले तरी काही ठिकाणी एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा होऊ शकतो. त्यावर महायुतीतील नेते कसा निर्णय घेतील हे आगामी काळात पाहणे महत्वाचे आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button