ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

व्हिटॅमिन B 12 चे चांगले स्रोत असणारे ड्राई फ्रूट

शरीरातील ताकद वाढवणार, मेंदू अधिक तल्लख, फाइबर मुबलक प्रमाणात

मुंबई : मनुका म्हणजे किसमिस. हे सुद्धा व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. रात्री मनुका भिजवून सकाळी त्या खाल्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. किसमिस इतर ड्राट फ्रूटच्या तुलनेत स्वस्तसुद्धा असतात. मनुका खाल्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात. खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. हा पदार्थ चविष्टसुद्धा आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील चांगले असते आणि विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. उपवास असताना अनेक वेळा खजूरचे सेवन केले जाते. खजूर खाल्यामुळे मेंदू अधिक तल्लख होतो.

काजू हे व्हिटॅमिन बी 12 चे मौल्यवान स्त्रोत आहेत. हे बऱ्याचदा स्नॅक म्हणून खाल्ले जातात. तसेच विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. काजूचा वापर केल्यामुळे तुमचा आहार एक स्वादिष्ट आणि पौष्टिकसुद्धा होतो.पिस्ता केवळ स्वादिष्टच नाहीत तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण देखील चांगले आहे. ते स्नॅक म्हणून, सॅलड टॉपिंग म्हणून किंवा दही किंवा डेझर्टमध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकतात. पिस्तामध्ये फाइबर मुबलक प्रमाणात असते.

बदामात व्हिटॅमिन बी 12 च्या लक्षणीय आहे. बदाम खाण्याचे अनेक फायदे आरोग्याला होतात. नास्तामध्ये किंवा सॅलड्स, दही किंवा मिष्टान्नमध्ये बदाम टाकून खातात. भारतात बदामाचे उत्पादन पुरेसे नसल्याने त्याची अफगाणिस्तान व इराण येथून आयात होते.भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते. तसेच इतर आवश्यक पोषक तत्वांचा त्यामध्ये समावेश असतो. आपल्या रोजच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करा किंवा स्नॅक म्हणून खा. याशिवाय सूर्यफुलाच्या बिया, अंजीर, अक्रोड यामध्येही बी 12 असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group