Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला; संजय राऊतांचा निशाणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेऊन आरतीमध्ये सहभाग घेतला. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले, संविधानाच्या घरालाच आग लागली. घरातील दिव्याने, ईव्हीएमला क्लीन चीट दिली, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या सुनावणीला तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू, पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप मात्र महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणात अवाक्षर काढले नाही, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर तारीख पे तारीख… हे का होत आहे? तुम्ही सर्व घटनाक्रम एकदा समजून घ्या.. भारत माता की जय..

हेही वाचा    –    राजकीय बांधकाम व्यावसायिकांच्या दुटप्पीपणामुळेच सोसायटीधारकांवर ‘‘पाणी संकट’’

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या खासगी निवासस्थानी येण्यास मान्यता दिली, हे धक्कादायक आहे. संविधानाने प्रदान केलेल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची आणि सरकार संविधानाच्या मर्यादेत काम करत आहे की नाही? याची खात्री करण्याची जबाबदारी असलेल्या न्यायव्यवस्थेसाठी या घटनेतून अतिशय वाईट संकेत जात आहेत. त्यामुळेच न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात एका हाताचे अंतर असणे आवश्यक आहे, असे मत प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button