क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारताचे सहा खेळाडू आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली तर पुढचं गणित सोपं होणार आहे. अन्यथा खूपच किचकट समीकरणाला सामोरं जावं लागेल. बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडवला असल्याने आत्मविश्वास दुणावलेला आहे. असं असूनही आयसीसीच्या क्रमवारीने बांगलादेशला घाम फुटला आहे. कारण भारताचे सहा खेळाडू आयसीसी क्रमवारीतील टॉप टेनमध्ये आहेत. तीन खेळाडू फलंदाजांच्या यादीत आणि तीन खेळाडू गोलंदाजीच्या यादीत आहेत. त्यामुळे भारताविरूद्धचा लढा पाकिस्तान इतका सोपा नाही. कारण या सहा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर सर्वकाही कठीण होणार आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या, डॅरिल मिशेल तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या आणि विराट कोहली सातव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तर गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.

कसोटीतील टॉप 10 फलंदाज

जो रूट (इंग्लंड)- 899 रेटिंग
केन विल्यमसन (न्यूझीलंड)- 859 रेटिंग
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड)- 768 रेटिंग
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- 757 रेटिंग
रोहित शर्मा (भारत)- 751 रेटिंग
यशस्वी जयस्वाल (भारत)- 740 रेटिंग
विराट कोहली (भारत)- 737 रेटिंग
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)- 728 रेटिंग
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- 720 रेटिंग
मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया)- 720 रेटिंग
कसोटीतील टॉप 10 गोलंदाज
आर. अश्विन (भारत)- 870 रेटिंग
जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) – 847 रेटिंग
जसप्रीत बुमराह (भारत)- 847 रेटिंग
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)- 820 रेटिंग
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- 834 रेटिंग
नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)- 801 रेटिंग
रवींद्र जडेजा (भारत)- 788 रेटिंग
काइल जेमिसन (न्यूझीलंड)- 729 रेटिंग
मॅट हेन्री (न्यूझीलंड)- 711 रेटिंग
शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 709 रेटिंग

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button