समृद्ध मावळ तालुक्यात राहणाऱ्या सर्व मावळवासियांना सुख, सुविधा लाभो
आमदार सुनील शेळके यांचे बाप्पा चरणी साकडे, जांभूळ येथील एक्झर्बिया सोसायटीमध्ये गणेशोत्सवाला भेट

वडगांव मावळः बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मावळवासियांना सुख, समृद्धीसोबत सुविधाही लाभो. कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा त्रास कुणालाही होऊ नये. तालुक्यातील सर्वांवर गणपती बाप्पाची कृपादृष्टी कायम बरसो, गणपती बाप्पाचे आशीर्वाद प्रत्येकसोबत राहो, असे साकडे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातले. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी वडगाव मावळातील जांभुळगाव येथील एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी संकुलातील सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणेश आरतीसाठी आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित होते. त्यादरम्यान आमदारांनी उपस्थितांना संबोधित करत बाप्पा चरणी साकडे घालताना आपले मत व्यक्त केले.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी, तसेच पोलीस प्रशासनासह, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. एक्झर्बिया अॅबोड, रहिवाशी संकुलातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा विविध समस्यांचा जणू पाढाच गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी वाचला. या समस्यांचा निपटारा करून सर्व सोयी-सुविधांनीयुक्त आरोग्यदायी वातावरण निर्मितीसाठी आपण कायम कटिबद्ध राहू, असे आश्वासन देत. येथील रहिवाशांनी सर्वांनी एकजूट करावी. मग एक्झर्बिया अॅबोड बिल्डरच्या कार्यालयात घुसून येथील रहिवाशांना सोयी-सुविधा पुरवायला आपण भाग पाडू. फक्त मी कार्यालयात शिरताना आपण सर्व रहिवाशांनी सोबत असावे, असे आवाहन यावेळी करत आमदार महोदयांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
यावेळी एक्झर्बिया सार्वजनिक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील,उपाध्यक्ष पंढरीनाथ हिंगे, खजिनदार योगेश हुले, सचिव,निलेश परदेसी, सहसचिव सुमित पुरी, मार्गदर्शन सल्लागार, प्रकाश कांबळे, सुनील पवार, दिनेश सकट,सचिन कुंभार,सार्थक कुंभार, बाबासाहेब लबडे, शैलेश घाग, आदी कार्यकर्ते कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार सुनील आण्णा यांच्यासमोर वाचला सोसायटीमधील समस्यांचा पाढा
यावेळी
गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक सचिन कुंभार यांनी सोसायटीमधील समस्यांचा पाढा आमदार सुनील आण्णा यांच्यासमोर वाचला. कुंभार म्हणाले की, एक्झर्बिया बिल्डरकडून वारंवार छळ होत आहे, मागील दोन वर्षांपासून येणार्या प्रत्येक सणासुदीला जिथे लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. अशावेळी वीज कपात करतात. बिल्डरला कारण विचारले तर बोलतात वीज बिल थकले आहे. तर MSEB कट करून गेले, सवलतीच्या (फॅसिलिटी) नावावर प्रत्येक फ्लॅट धारकांकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले होते, परंतु, सध्या कोणतीही सुविधा देत नाहीत आणि होणार्या कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावत नाही, दूषित पाणी पुरवले जाते जे वापरासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही, सांडपाणीचे विल्हेवाट लावत नाही. लिफ्ट दिले आहे तर त्याचे देखभाल करत नाही. त्यामुळे लाईट गेली तर बॅकअप नसल्यामुळे लोक लिफ्टमध्ये अडकतात. मागील २ वर्षांपासून बिल्डर फक्त मेंटेनन्स चार्जेस जमा करत आहे. सोसायटी विना सिक्युरिटी आहे. सोसायटीमध्ये कोणती ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत नसल्याने रहिवाश्यांचे जगणे एक प्रकारे धोक्यात आहे. या व्यतिरिक्त बिल्डर ने ७ अॅमिनिटीज देण्याचे कबुल केले होते. त्यामध्ये क्लब हाऊस, मुलांना खेळण्यासाठी जागा, जॉगिंग ट्रेक, कम्युनिटी सेंटर, सिमेंट रोड, फेस्टिवल प्लाझा, गार्डन्स, जिम, वॉकिंग एरिया, या पैकी फक्त सिमेंटरोड दिले होते. त्याचा ही मेंटेनन्स नीट होत नाही. या गृहप्रकल्पची नोंदणी न झाल्याने बिल्डर विरुद्ध तक्रार करण्यासाठी आम्हाला कोणी मदत करत नाही. तर आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत कि आमच्या गृह प्रकल्पाची एकदा तुमच्याकडून आणि सरकारकडून सर्वे करणे, आणि आमची जी फसवणूक झाली आहे त्यात आम्हाला योग्य मार्ग दाखून न्याय मिळूवन देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी आमदार सुनील शेळके यांच्याकडे एक्झर्बिया अॅबोड सोसायटी धारकांकडून करण्यात आल्या.




