Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करा’; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणे :  मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शैक्षणिक संस्थांना केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे येथे आयोजित २१ व्या पदवीप्रदान समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, प्र. कुलगुरू डाॅ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेत संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्षांच्या संशोधनामुळे नवीन शोध आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन उपाय शोधले जातात. भारतातील संशोधक विद्यार्थी केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या समस्यांवर उपाय शोधू शकतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही संशोधनावर भर देण्यात आला असून, बहुशाखीय अभ्यासक्रम आणि समग्र शिक्षणालाही चालना दिली जात आहे.

हेही वाचा    –      ‘द कंदहार हायजॅक’ या वेबसीरीजवरून वाद पेटला, नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर

दरम्‍यान, देश- विदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा. गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आणि अन्य कारणांमुळे समाजाच्या परिघाबाहेर जगणाऱ्या लोकांचाही विचार करावा, असे आवाहन राधाकृष्णन यांनी या वेळी केले.

डॉ. मुजूमदार म्हणाले, सिंबायोसिस विद्यापीठात शिक्षण, संशोधन, व्यवसाय आदी बाबींसह विशेषत: मूल्यशिक्षण देण्यावर भर देण्यात येतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेवर काम करून जागतिक पातळीवर ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहे. भारताचे नाव विदेशात पोहोचविण्याचे काम करीत आहे.

देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील, अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत, असा संदेश राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button