Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनोज जरांगे पाटील यांची रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता रॅली

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून रॅलीला सुरूवात

पिंपरी | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पिंपरी-चिंचवड शहरात रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व शांतता रॅली होणार आहे. संभाजीनगर येथे या नियोजनासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची बैठक झाली. यावेळी चर्चा करण्यात आली.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून रॅलीला सुरूवात होणार आहे. यामध्ये देहूरोड, मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्ती-शक्ती येथे सहभागी होतील. काळेवाडी, रहाटणी भागातील मराठा बांधव पिंपरी चौकात सहभागी होतील. खेड, जुन्नर व चाकण या भागातून येणारे बांधव नाशिक फाटा येथे सहभागी होतील. रॅली एकत्रितपणे भक्ती शक्ती चौकातून सकाळी ९ वाजता निघेल. ९.१५ वाजता पिंपरी चौकात आणि ९.३० वाजता नाशिक फाटा येथे पोहचेल. त्यानंतर पुण्यातील सारसबागच्या दिशेने वाटचाल करेल.

हेही वाचा    –      विनेश फोगाट ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरणं धक्कादायक; पंतप्रधान मोदींकडून भावना व्यक्त 

पुण्यातील रॅली सकाळी ११ ला निघेल. स्वारगेट येथील सारसबाग-बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन (अलका टॉकीज) या मार्गाने जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button